परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने
प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. …